अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-  सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांची होणारी गर्दी लक्ष्यात घेता अद्याप आठवडे बाजार सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही. त्या अनुशंगाने जिल्ह्यातील आठवडे बाजार बंदच ठेवलेले आहेत.

त्यामुळे श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजार देखील बंदच राहणार आहे. तेरी व्यापारी व शेतकर्‍यांनी आजच्या दिवशी आठवडे बाजारात भाजीपाला, फळ विक्री करू नये, असे आवाहन श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यात अनेक निर्बंध घातलेले होते. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे.

त्यामुळे नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक निर्बंध शिथिल केले, मात्र अद्याप आठवडे बाजार भरवण्याबाबत कोणतेही आदेश दिले नाहीत. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील शुक्रवार आठवडे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत .

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24