file photo

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-   येथील झोपडी कॅन्टीन परिसरातील प्रकाश वाईन्स दुकानाच्या व्यवस्थापकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून १० लाख ७० हजाराची रक्कम चोरले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीला अवघ्या सहा दिवसातच आरोपींना जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे यात नोकरच या गुन्ह्यात मास्टरमाइंड असल्याचे तपासात समोर आले आहे.

लखन नामदेव वैरागर (वय २९), प्रमोद बाळू वाघमारे (वय २३, दोघे रा. नागापूर), विशाल भाऊसाहेब वैरागर (वय २५, रा.नेवासा) व दीपक राजू वाघमारे (वय २०, रा. नागापूर) असे अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील दोन आरोपी पसार आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून ५ लाख २० हजाराची रोकड, ३ लाख ४० हजाराच्या मोटारसायकली, ४२ हजार ५०० रुपयांचे चार मोबाईल असा एकूण ९ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे कामगारच लुटारु निघाल्याचे निष्पन्न झाले आहे.

लखन वैरागर हा प्रकाश वाईन्स या दुकानात कामाला होता. त्यानेच साथीदारांच्या मदतीने कट रचून लूटमार केल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.