अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत हे आज अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांचे शहराच्यावतीने महापौर रोहिणी शेंडगे यांनी स्वागत केले. यावेळी महापौर शेंडगे यांनी महत्वपूर्ण मागणी मंत्र्यांकडे केली आहे.
नगर शहराच्या सर्वांगिण विकासाठी राज्य सरकारने वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावा, त्याचप्रमाणे नगरचा वाढता विस्तार पाहता तंत्रशिक्षणाच्या जागा वाढविण्यात याव्यात, अशी मागणी महापौर रोहिणी शेंडगे यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली.
यावेळी बोलताना मंत्री सामंत म्हणाले कि, राज्य शासनाच्यावतीने विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारी योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम स्थानिक पातळीवर होणे गरजेचे आहे.
महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरकरांसाठीच्या विविध योजनांसाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करु. त्याचबरोबर तंत्रशिक्षणाबाबत नगरमध्ये चांगला वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करु.
त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा त्याचा फायदा होईल, असे ते म्हणाले. याप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, संजय शेंडगे, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, गणेश कवडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा आदी उपस्थित होते.