अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनामुळे सध्याच्या परिस्थितीत शिक्षण विभागात सर्वाधिक बदल झालेले आहे. कोरोनाची परिस्थितीत पाहता अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या.
तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. यातच एमबीबीएसच्या परीक्षांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी मोठी माहिती दिली आहे.
एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं आहे. या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत.
परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर येणं जाणं किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व पाहता परीक्षा पुढे ढकलणं शक्य असल्याने, आम्ही हा निर्णय घेतला.
असं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील ३५० जण करोना संसर्गाने ग्रासले आहेत.
त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, तसेच १९ एप्रिलला सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.