ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी लोणावळा येथील बैठक महत्वपूर्ण ठरणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- दि.26 व 27 जून रोजी लोणावळा येथे होणार्‍या ओबीसींच्या चिंतन शिबीराच्या नियोजनासाठी नगर येथे बैठक़ आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बोलतांना ओबसी, व्हीजेएनटीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप म्हणाले की, ओबीसीच्या संतप्त भावना आता सर्वांनी घ्यानात घेतल्याचे लक्षात येते म्हणून ओबीसीच्या प्रश्‍नांसाठी सर्व राजकीय पक्षांसह संघटनांचे नेते सक्रिय होत आहे.

या लढ्यासाठी प्रत्येक ओबीसीची मानसिकता निर्माण करावी लागेल. संघटना उभी राहिली पाहिजे, ग्रामपंचायतीमध्ये 80 टक्के ओबीसींच्या ताब्यात आहे. अल्पसंख्याक, मुस्लिम, दलित, ओबीसी, आदिवासी, भटक्या सर्व एकत्र आल्याने त्यांचा परिणाम झाला.

ओबीसी बांधव एकत्र येत आहेत. पुढील काळात ओबीसींचे मजबूत संघटनच आपल्या मागणी पुर्ण करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. त्यासाठी लोणावळा येथील चिंतन बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेऊन ओबीसी आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे सांगितले.

26-27 जूनला लोणावळा येथे होणार्‍या चिंतन शिबीराच्या नियोजनासाठी संघटनेच्या नगर शहर जिल्हा शाखेची बैठक येथील नक्षत्र लॉन येथे श्री.सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते. यावेळी माजी नगरसेवक अंबादास गारुडकर, सुनिल भिंगारे, अशोक दहिफळे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, ग्रामपंचायत सदस्या सौ.किरणताई आळकुटे, मंगल भुजबळ, अनुरिता झगडे,

डॉ.सुदर्शन गोरे, डॉ.श्रीकांत चेमटे, प्रकाश लोळगे, सुषमा पडोळे, रमेश बिडवे, शौकत तांबोळी, शशिकांत पवार, रमेश सानप, आर्यन गिरमे, अनिल इवळे, संजय आव्हाड, छाया नवले, अंकुश कुलांगे, महेश कुलांगे, फिरोज खान,

अभिजित कांबळे, स्वाती पवळे, वनिता बिडवे, प्रशांत भाले, कैलास गर्जे आदि उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब भुजबळ म्हणाले, राज्यभरातील ओबीसी जागा होत असून, आपल्या हक्कासाठी लढत आहेत.

ओबीसी संघटनेच्या माध्यमातून हे हक्क आपणास मिळवायचे असून, त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. नगरमध्ये ओबीसींचे चांगले संघटन होत असून,

राज्यात दिशा दर्शक काम नगरची संघटना वरिष्ठ पातळीवरील नेते ना. विजय वडेट्टीवार व संस्थापक बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली करेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

यावेळी उपस्थितांची विविध विषयांवर चर्चा होऊन लोणावळा येथील चिंतन शिबीराबाबतचे नियोजन करण्यात आले. सूत्रसंचालन राजेश सटाणकर यांनी केले तर आभार अशोक दहिफळे यांनी मानले.

अहमदनगर लाईव्ह 24