अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- मुंबई महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे.
आज दि.१९ रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तर विदर्भासह उर्वरित भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या पूर्वीच नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीसह इतर घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यातुन कुठेतरी शेतकरी सावरत असतानाच आता परत एकदा पावसाची शक्यता वर्तीवली असून, यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
दरम्यान कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड,
उस्मानाबाद आणि लातूर या भागाला हवामान खात्याकडून देण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.