अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान आ. लंके यांनी मतदारसंघातील नागरिकांना बिनविरोध निवडणुका करण्याचे आवाहन केले होते.
बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो, असे आश्वासनही लंके यांनी दिले होते. दरम्यान आमदार लंके यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना निधी मंजूर केला आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
लंके समर्थकांच्या दाव्यानुसार तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी हंगे, शिरापूर, रांधे, कारेगाव, वेसदरे, पिंप्री पठार, जाधववाडी, भोयरे गांगर्डा व पळसपूर या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. नगर तालुक्यातील अकोळनेर ही ग्रामपंचायतीही बिनविरोध झाली.
प्रत्येकी २५ लाख निधी मंजूर झालेली गावे व निधी पुढीलप्रमाणे : पाबळ तळेवाडी ते पांढरकरवस्ती रस्ता १५ लाख, जवळा : जवळा ते गाडीलगाव रस्ता करणे २५ लाख, पळसपूर येथे स्मशानभूमी सुशोभीकरण २५ लाख, शिरापूर येथे उचाळे वस्ती शिरापूर रस्ता करणे २५ लाख,
हंगे येथे सामाजिक सभागृह बांधणे ५० लाख, भोयरे गांगर्डा येथे गजाबाई मुक्ताबाई मंदिर पेव्हर ब्लॉक बसविणे २५ लाख, कारेगाव चारंगेश्वर मंदिर सभागृह १५ लाख तसेच मुक्ताबाई मंदिर पेव्हर ब्लॉक १० लाख, पिंप्रीपठार येथे भैरवनाथ मंदिर सभामंडप २५ लाख,
वेसदरे येथे सांस्कृतिक भवन २५ लाख, जाधववाडी स्मशानभूमी १० लाख तसेच प्रवेशद्वार १५ लाख, रांधे येथे रांधूबाई सभामंडप १५ लाख, मस्जिद सुशोभीकरण १० लाख, देवसवडे येथे टेकडवाडी ते काळेवाडी घाट २५ लाख,
राळेगण थेरपाळ येथे डोमेवस्ती ते खंडोबावस्ती रस्ता १५ लाख, कडूस येथे वाघाजाई मंदिर सभामंंडप ५ लाख, नांदूरपठार येथे श्रीकृष्ण मंदिर सुशोभीकरण ५ लाख, बाबुर्डी बेंद, ता. नगर गावठाण ते शिवरस्ता २५ लाख, पिंप्रीघुमट ते हंंडेवस्ती रस्ता नळकांडी पुलासह तयार करणे
२० लाख, अकोळनेर गावांतर्गत काँक्रिटीकरण १० लाख, देऊळगाव सिद्धी सांस्कृतिक सभागृह बांधकाम ५० लाख, बाबुर्डी घुमट रस्ता २० लाख, नांदगाव येथे होलट वस्ती ते कोलबेट रस्ता १० लाख, हिंगणगाव येथे कुरणमळा रस्ता २५ लाख.