अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- आज जिल्हयात व शहरात रेमडीसिवर इंजेक्शनची टंचाई भासत चालली असुन कोरोना आजारांवर उपचार घेणाऱ्या रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत.
सर्वत्र भटकंती करुण सुध्दा रेमडीसिवर इंजेक्शन मिळत नसून कुठे मिळालेच तर काळ्या बाजारातून विकत घ्यावे लागत आहे. बाजारभाव पेक्षा दुप्पट , तिप्पट किमतीने ते कोरोना रुग्णांच्या उपचारा करीता ते घ्यावे लागत आहे.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल चालु असुन सरकारचे या काळा बाजार करणाऱ्यांवर कुठेही नियंत्रण नाही आहे. एका बाजुला अन्न व औषध प्रशासन जिल्हयात व शहरात पुरेसा रेमडीसिवर इंजेक्शन चा साठा उपलब्ध आहे
असे वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर करतात तर दुसरीकडे त्याच रेमडीसिवर इंजेक्शन साठी रुग्णांच्या नातेवाईकांना गावभर फिरावे लागत आहे फिरूनही ते मिळत नाही त्या मुळे कोणी तरी काळा बाजार करणाऱ्याचा पत्ता सांगतात व तेथून ते खरेदी करावे लागते
रुग्णांचा गरजेचा फायदा हे रेमडीसिवर इंजेक्शन चा काळा बाजार करणारे हे एजंट लोक करीत असुन अश्या काळा बाजार करणाऱ्याची माहिती आम्हाला द्या आम्ही त्यांना जागच्या जागी ठोकून काढू अशी माहिती मनसेचे नितीन भुतारे यांनी केले आहे.
त्या करीता तुम्ही मनसेच्या स्थानिक पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा नितीन भुतारे मो. नंबर७३०४६१२१२१, सचिन डफळ९८२२४१७६१६, या मोबाईल नंबर वर संपर्क साधा.