अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या साई संस्थांनमध्ये विश्वस्थ मंडळ कधी होणार ? ह्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून मंगळवार २२ जून रोजी शिर्डी साई संस्थानचे अधिकृत विश्वस्थ मंडळ स्थापन होणार असून त्याची अधिकृत यादीची घोषणा त्याच दिवशी राज्य सरकार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अतिशय महत्वाच आणि मानाचं पद म्हणून विश्वस्थ पदाची ख्याती आहे म्हणून अनेकांनी मुंबईला आपआपल्या सोयीनुसार अनेक मंत्र्याकडे फिल्डिंग लावली होती परंतु मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार दोन आढवड्याची मुदत विश्वस्थ मंडळ स्थापनेसाठी राज्यसरकरला दिली आहे,
त्यानुसार विश्वस्थ मंडळातील प्रत्तेक सदस्याचे चारित्र्य तसेच शैक्षणिक पात्रता, अनुभव तसेच भक्तमंडळाचा सदस्य या बाबी तपासूनच अभ्यासपूर्वक निवडी केल्या असून सध्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय कॉग्रेसमध्ये रस्सीखेच सुरूच असून येत्या दोन दिवसात त्याचा तिढा सुटणार आहे.
प्रशांत गडाख(नेवासा),रावसाहेब खेवरे(राहूरी), राजेंद्र फाळके(कर्जत), राजेंद्र झावरे(कोपरगाव), करण ससाणे(श्रीरामपूर),चेतन लोखंडे(श्रीरामपूर), हेमंत ओगले(श्रीरामपूर), किरण काळे(नगर), सुरेश वाबळे(राहूरी), शशिकांत गाडे(नगर),
कमलाकर कोते(शिर्डी), राजेंद्र पठारे(राहाता), सचिन कोते(शिर्डी), सुधाकर शिंदे(शिर्डी),रमेश गोंदकर(शिर्डी), महेंद्र शेळके(शिर्डी), निलेश कोते(शिर्डी) याशिवाय राज्यातील तिन्ही पक्षाचे अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत.