अरे बाप रे, मान्सून सहा दिवसांनी लांबला, आठवभरात तसूभरही प्रगती नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra news : यावर्षी मान्सून दहा दिवस लवकर येणार म्हणून अंदाज वर्तविण्यात आले होते. ते सपशेल खोटे ठरले असून प्रत्यक्षात मान्सूला सहा दिवस उशीर होत आहे.

गेला आठवडाभर मान्सूनच्या वाटचालीत तसूभरही प्रगती झालेली नाही. आता मान्सून तर उशिरा येणारच शिवाय त्याचा एकूण पावसावर परिणाम होणार असल्याचाही अंदाज वर्तविण्यात येत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

सुरवातीच्या काळात अंदाज वर्तविल्यानुसार मान्सूनची वाटचाल लवकर सुरू झाली. मात्र, पुढे त्याच्या प्रवासात अडथळे येत आहेत. अरबी समुद्राकडी त्याची बाजू मागे पडली आहे. केरळचा भाग व्यापून मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यापर्यंत येऊन दाखल झाला होता.

मात्र, तो ३१ मे रोजी ज्या ठिकाणी होता, त्याच ठिकाणी ७ जूनलाही आहे. आठवडाभरात तसूभरही प्रगती झाली नाही. त्यामुळे भारताच्या काही भागांवर त्याची प्रगती आता जवळपास सहा दिवसांनी लांबली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

त्यातच आता हंगामासाठी देशभरातील पाऊस ३८% कमी होण्याची शक्यता आहे.भारताच्या मध्यवर्ती भागांमध्ये अँटी-चक्रीवादळाची स्थिती झाली आहे. ही गोष्ट मान्सूनच्या प्रगतीसाठी चांगली नसते. त्यामुळे मान्सून सामान्य राहत नाही.

अरबी समुद्रातील प्रवाह खूपच कमकुवत आहे. त्यामुळे मान्सून पुढे येत नाही. तो अरबी समुद्रातच रेंगाळला असल्यामुळे महाराष्ट्रात कधी येणार, याचे संकेत मिळत नाहीत, असेही आयएमडीकडून सांगण्यात आले.