ताज्या बातम्या

आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- दिल्लीत एक अत्यंत ह्रद्यद्रावक घटना समोर आली आहे. सख्ख्या आईने आपल्या दोन लहानग्यांना जमिनीवर आपटून आपटून मारल्याचा व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे.

५३ सेकंदांचा हा व्हिडिओ दिल्ली शहरातला आहे सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालेल्या तारखेनुसार यावर्षी १९ सप्टेंबरला ही घटना घडली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी हा व्हिडिओ शेअर करत, या घटनेवर कारवाईची मागणी केली आहे. एक महिला आपल्या ५, ६ वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे.

मुलाच्या डोक्यावर, छातीवर, पायांवर पाठीवर जिथे मिळेल तिथे ही महिला मारत सुटल्याचे दिसते आहे. मारहाणीच्या वेळी मध्येच ती त्याचा गळा दाबताना आणि केस ओढतानाही दिसते आहे. मारापासून वाचण्यासाठी लहानगा कधी आपला पाय तर कधी हात पुढे करतोय, पण ही महिला मारताना थकत नसल्याचे दिसते आहे.

तिच्या शेजारीच एक दुसरी महिला उभी आहे, ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते आहे, तो मुलगा आहे असं सांगत मारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतेय, पण मारणारी महिला तिचे अजिबात ऐकत नाहीये. या महिलेचा क्रूरपणा इथेच संपत नाही.

ही सगळी मारहाण होत सताना तिथेच शेजारी एक दीड वर्षांचा चिमुरडाही उपस्थित आहे, आपल्या मोठ्या भावाला मारताना पाहून तोही मोठमोठ्या रडताना दिसतो आहे. त्यांची आई मोठ्या मुलाला मारल्यानंतर पतर वळून या दीड वर्षांच्या मुलालाही आपटून आपटून मारताना व्हिडिओत पाहायला मिळते.

ही कजाग बाई या मुलाला जमिनीवर आपटते की काय, असेही एक क्षण वाटल्याशिवाय राहत नाही. ही महिला या मुलांना मारहाण का करते आहे, याचे उत्तर मात्र अद्याप मिळू शकलेले नाही.

Ahmednagarlive24 Office