अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरातील पुणतांबा रोडवर असणाऱ्या डावखर मंगल कार्यालयाच्या समोर, वॉर्डनंबर १, श्रीरामपूर
याठिकाणी मोटरसायकल क्रमांक एमएच १७ ८४८५ या मोटारसायकलचे चालक विश्वनाथ गोपीनाथ मापारी, वय ६१, रा. पुणतांबा रोड, पेट्रोल पंपासमोर हे मृत झाले.
अधिक माहिती अशी की, मोटर सायकलचा वेग जास्त असल्या कारणाने त्याचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि तोल जाऊन ते जोरात रोडवर पडले.
या अपघातात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.