अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-शेवगाव तालुक्यातील येथील अकरा वर्षीय सार्थक अंबादास शेळके या मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही.
गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गावातच ठाण मांडून या प्रकरणाचा उलगडा करण्यात गुंतले आहे.
मात्र त्यांच्या हाताला धागादोरा मिळाला नाही. खुंटेफळ येथे ११ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली होती. ही हत्या कोणत्या कारणातून झाली.
हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गावातील तसेच भावकीतील लोकांची कसून चौकशी केली. मात्र हाताला कोणताही ठोस पुरावा लागला नाही.
शेवगाव पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोबाईल आणण्यासाठी गेलेल्या सार्थकचा मारेकरी कोण हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. याप्रकरणी तपास निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.