बहुचर्चित श्रीराममंदिर पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत दर्शनासाठी खुले होणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले अयोध्येतील बहुचर्चित श्रीराममंदिर पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत दर्शनासाठी खुले होणार आहे. एका वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

श्रीराम मंदिर ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 पर्यंत श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे काम पूर्ण होईल. अयोध्येतील या मंदिराचे बांधकाम 2024 च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण वेगाने सुरू आहे.

हे काम या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मागील वर्षी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे लोकार्पण केले. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरु असतानाच दर्शन सुरु होणार आहे. श्रीराम मंदिराच्या बांधकामात स्टील आणि विटांचा वापर केला जात नाही.

विशेष म्हणजे, मुख्य मंदिराचे बांधकाम 5 एक्कर जमिनीवर केले जाईल, तसेच उर्वरित जमिनीवर संग्रहालय आणि ग्रंथालय इत्यादी केंद्रे बांधले जाणार आहेत. मंदिराचे काम सध्या पूर्ण वेगाने सुरू आहे. त्यासाठी 12 तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम केले जात आहे.

हैदराबादेतील नॅशनल जि रिसर्च इन्स्टिट्युट आणि गोवाहटीतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नोलॉजीचे तज्ञ या बांधकामाच्या कामात सल्ले देत आहेत. बांधकामाच्या समितीने मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 2024 अखेरपर्यंतच मुदत निश्‍चित केली आहे.

या वर्षाच्या प्रारंभी बांधकाम समितीने मंदिराच्या आवाराच्या विस्तारित बांधकामाबाबत निर्णय घेतला आहे. यानुसार मंदिराचा परिसर आता 70 एकरच्या ऐवजी 107 एकरापर्यंत विस्तारलेला असणार आहे. या परिसरामध्या अन्य काही सुविधांही समावेश करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24