अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- दोन दिवसांपूवी शेतात काम करत असताना नारायणगव्हानचा माजी सरपंच राजाराम शेळके यांचे हत्या करण्यात आली होती. या खुनाचा उलगडा झाला आहे.
तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राजकीय वर्चस्व व आपसातील भांडणाच्या कारणावरून नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याने भाडोत्री शार्प शुटरकडून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची हत्या घडवून आणली होती.
याप्रकरणी शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहुल तसेच इतर तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राजारामसह इतर आरोपींना न्यायालयाने पॅरोल रजा मंजूर केली होती. वडिलांचा खून केल्याचा राग मनात धरून कांडेकर यांचा मुलगा संग्रामच्या मनात हा कट शिजला.
वडिलांच्या हत्याराचा बदल घेण्यस्तही त्यांने प्लॅन आखला.आरोपी शेळके त्यांच्या शेतातुन एकटाच परतत होता. हीच संधी साधत संग्राम याने पाठीमागून येऊन राजारामच्या मानेवर सपासप तलवारीचे वार केले. तो जमिनीवर कोसळला.
संग्राम याने त्याच्या मानेवर दोन जोरदार वार केले आणि पुन्हा उसात जाऊन लपला. संग्राम यानेच ही माहिती पोलिसांना दिली.