ज्या पाल्याचे आई वडील कोरोनाने मृत्यू पावले अशा पाल्यांना राष्ट्रवादी जीवलग उपक्रम मदत करणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राष्ट्रवादी जिवलग हा अभिनव उपक्रम राज्यभरात राबवण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी महसूल उर्मिला पाटील यांना पत्र देताना कार्याध्यक्ष संदीप वर्पे,

युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शहर युवक जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवती जिल्हाध्यक्ष राजेश्वरी कोठावळे, किसनराव लोटके, ॲड.शारदाताई लगड, युवती शहर जिल्हाध्यक्ष अंजली आव्हाड, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, विशाल मस्के, अनिकेत राठोड,

गालिब सय्यद आदी उपस्थित होते. मागील दोन वर्षापासून कोरोना महामारी ने अक्षरक्ष जनसामान्यांची जीवन उद्ध्वस्त करून टाकले आहे अनेक निष्पाप मुलांनी आपले आईवडील गमावले आहेत दुर्दैवाने लहान वयातच त्यांच्या वाट्याला पोरकेपण आले आहेत

आपल्या राज्य पुरता विचार करावयाचा झाला तर दोन्ही पालकांचे छत्र हरवलेली चारशेहून अधिक बालके संकटात सापडली आहेत त्यांना शासन नातेवाईक व सामाजिक संस्था मदत करीत आहेत ही मदत साधारणपणे आर्थिक स्वरूपाची किंवा वस्तू स्वरूपाची आहे

परंतु त्यांना आयुष्यभर साथ देणारा मायेने त्यांच्याशी आपुलकीचे नाते जोडणारा स्वयंसेवक असणेही गरजेचे झाले आहे पैसे पलीकडचे नाते या मुलांच्या मनामध्ये नवा विश्वास निर्माण करेल अशा सेवाभावी कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना यापैकी प्रत्येक बालकाची नाते निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या हाती घेतला आहे

राष्ट्रवादी जिवलग या उपक्रमाचा आरंभ राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या विश्वस्त तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 22 जुलै रोजी च्या वाढदिवशी करीत आहे

अहमदनगर जिल्ह्यातील अशा बालकांची माहिती शासनाच्या महिला व बालकल्याण खात्याकडून प्राप्त झाली आहे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या मुलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील व त्यांना त्यांचे बालपण पुन्हा मिळवून देईल.

अहमदनगर लाईव्ह 24