ताज्या बातम्या

राष्ट्रवादीने ऐनवेळी बदलला मतांचा कोटा, शिवसेनेची धाकधूक

Published by
Ahmednagarlive24 Office

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार असून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई होत आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार सध्या तरी महाविकास आघाडीचं पारडं जड असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक मतांच्या कोट्यात बदल केल्याने शिवसेनेच्या जय पवार यांची डोकेदुखी वाढली आहे.

राज्यसभा मतदानाची प्रक्रिया क्लिष्ट असते. त्यामुळे ऐनवेळी काही गडबड होऊ नये म्हणनू काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापल्या उमेदवारांना ४२ मते देण्याऐवजी दोन ते तीन मतांचा कोटा वाढवून देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीचा ४४ चा कोटा दिला जाईल.

तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसकडील सगळा ४४ चा कोटा त्यांना दिला जाईल. त्यामुळे सेनेच्या दुसऱ्या उमेदवारांची पहिल्या पसंतीची मते ४० वरून ३६ वर येतील व चुरस अधिक वाढेल.

याशिवाय माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासंबंधी हायकोर्टात काय निर्णय होतो, त्यानुसार विजयासाठी मतांचा कोटी किती ठरतो, त्यावरही हे गणित अवलंबून असणार आहे.

Ahmednagarlive24 Office