प्लाझ्मा दान करण्याची मानसिकता रुजवण्याची गरज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- संपूर्ण देशभरात कोरोना ने चांगलेच कहर केले आहेत.

आलेल्या दुसरी लाटेचा प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होतांना दिसत आहेत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना वेळेवर बेड मिळेना, उपचारासाठी लागणारे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आलेल्या संकटाला सामारे जावे लागत आहे.

कोरोना बाधित रुग्णांना इंजेक्शन पेक्षा प्लाझ्मा थेरपी रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याने प्लाझ्माची दिवसेंदिवस मागणी वाढत आहेत.

तितकेच तुटवडा देखील प्रचंड वाढत असुन सामाजिक जबाबदारी म्हणून प्लाझ्मादान करण्याची मानसिकता रुजविण्याची गरज असल्याचे मत कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन, नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.

कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना उपचार, औषधे, इंजेक्शन वेळेवर न मिळाल्याने अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे.

दुसरी लाटेत कोरोनाची परिस्थिती पहिल्यापेक्षा ही गंभीर राहणार हे माहिती असतांना देखील सरकार ने उपाय योजना केले पाहिजे होते.

परंतु कुठल्याही उपाय योजना न केल्याने परिस्थिती हातातुन निघुन गेली व त्या परिस्थितीचे खापर नागरिकांवर फोडण्याचे काम सुरु केले. सुरुवातीलाच उपाय योजना केले गेले असते. अनेकांचे प्राण देखील वाचले असते.

गंभीर झालेली परिस्थिती हाताबाहेर गेली नसती.कोरोनांमुळे अनेकांची आर्थिक गणिते बिघडल्याने उपचारासाठी पैसे उभे करायचे तरी कसे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक रुग्ण घरच्या घरी उपचार घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.

जे काही रुग्ण हाॕस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना देखील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहेत, यावर प्लाझ्मा हा एकमेव पर्याय असल्याने रुग्णांचे नातेवाईक प्लाझ्मासाठी रात्रंदिवस एक करत आहेत.

प्लाझ्माची मागणी येत आहेत यावरून असे लक्षात येते की, प्लाझ्माचा प्रचंड तुटवडा आहे. रुग्ण कोरोना बाधित झाल्यापासुन तर तो रुग्ण घरी जाईपर्यंतची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहेत तीच माहिती सेवाभावी संस्था ,

रक्तपेढी यांच्या कडे दिलीतर निश्चितच प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यास चांगली मदत होईल त्याचबरोबर रुग्णांना दिलासा देखील मिळेल.

कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी सुविधा उपलब्ध होत नसल्याने वैद्यकीय अधिकारी, नागरिक देखील हतबल झाले आहेत.प्लाझ्मा हा रक्तातील एक पिवळसर द्रव घटक असून त्याचे रक्तातील प्रमाण सुमारे ५५ टक्के इतके असते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24