निगेटिव्ह रिपोर्ट ठरणार व्यावसायिकांच्या व्यवसायाची चावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाने एक अजबच फतवा काढला आहे.

यामध्ये दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेत्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा केला आहे. हा रिपोर्ट नसल्यास दुकाने सील करण्यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा फैलाव पाहता दुकानदार, भाजी आणि फळ विक्रेत्यांसह नागरिकांनीही कोरोना नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे. मात्र अनेक ठिकाणी त्याची पायमल्ली केली जात आहे. त्यावर कॅन्टोमेंट बोर्डाने हा उपाय शोधला आहे.

31 मार्च 2021 नंतर कोरोना चाचणी प्रमाणपत्र अर्थात निगेटिव्ह रिपोर्ट दुकानदार, विक्रेत्यांकडे असणे अनिर्वाय आहे. हा रिपोर्ट नसल्यास संबंधित दुकानदारांकडून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला जाणार असून दुकान सील केले जाणार आहे.

तसे आदेशच कॅन्टोमेंट बोर्डाची सीईओ विद्याधर पवार यांनी काढले आहेत. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे निवेदन सीईओ पवार यांनी काढले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24