घरात शिरताच नेटवर्क गायब होते ? ‘ही’ सोपी ट्रिक चुटकीसरशी सोडवेल तुमची समस्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Mobile Network Tips : स्मार्टफोन , इंटरनेट ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. परंतु अनेकांना घरामध्ये नेटवर्कची समस्या येते. घरात पाऊल ठेवताच त्यांच्या स्मार्टफोनमधून नेटवर्क गायब होत. उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही एक सामान्य समस्या बनली आहे.

यामुळे जेव्हा कोणी तुम्हाला फोन करतो किंवा कोणी तुम्हाला सोशल मीडियावर मेसेज करतो, तेव्हा तो मेसेज किंवा कॉल तुम्हाला येत नाही. कारण तुम्हा नेटवर्क नसते. परंतु यावर आज आम्ही तुम्हाला असा काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे ही समस्या दूर होईल.

‘या’ डिव्हाईस द्वारे दूर होईल समस्या

आज आम्ही तुम्हाला ज्या डिव्हाइसबद्दल सांगणार आहोत ते आहे बूस्टिंग डिव्हाइस आहे आणि या डिव्हाइसच्या मदतीने आपण रात्री च्या वेळी घरातील सेल्युलर नेटवर्कची ताकद वाढवू शकतो. खरं तर घर बांधताना कधी कधी गरजेपेक्षा जास्त उंचीवर बांधले जाते. किंवा सिग्नल नीट मिळत नाही अशा पद्धतीने त्याची रचना असते.

अशावेळी कॉल करताना आणि इंटरनेट वापरताना तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते आणि या समस्येपासून सुटका कशी मिळवायची हे समजत नाही. या समस्येचा सामना करण्यासाठीच या डिवाइस वापर केला जातो.

आपण हे डिव्हाइस ₹ 3000 ते ₹ 4000 दरम्यान ऑनलाइन खरेदी करू शकता. जेथे सिग्नल येत नाही तेथे ते लावू शकता. हे डिव्हाइस इन्स्टॉल करणंही खूप सोपं आहे.

हे डिव्हाइस लहान असल्याने ते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात इन्स्टॉल केले जाऊ शकते आणि एकदा तुम्ही त्याचा वापर सुरू केला की घरात कितीही स्मार्टफोन असले तरी प्रत्येकाची सिग्नल स्ट्रेंथ चांगली असते आणि तुम्ही कॉलिंगचा सहज आनंद घेऊ शकता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24