राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंत:करण पिळवटून टाकणारे…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- काँग्रेस पक्षाचे युवा नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंत:करण पिळवटून टाकणारे आहे.

तरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उवल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला,

अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. खासदार राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून मंत्री थोरात म्हणाले, खासदार राजीव सातव यांचे काम मी जवळून पाहिले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती सदस्य ते खासदार प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना गरीब, कष्टकरी जनता, तरूण व शेतकर्‍यांचे प्रश्न ते अत्यंत तळमळीने मांडत असत.

आपल्या कामाच्या ताकदीवर ते कमी वयात देश पातळीवरच्या राजकारणात पोहचले. आमदार, खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24