अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- सध्या कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच परत शेतकऱ्यांना एका नैसार्गिक आपत्तीचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत आहेत.
आधीच लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प झाले आहे.परीणामी शेतमालाला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.त्यात परत हवामान खात्याने राज्यात गुरुवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यामध्ये मध्य महाराष्ट्र , विदर्भ , मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर कोकणातही पाऊस होण्याचा अंदाज आहे.,पश्चिमी चक्रीवादळामुळे राज्यांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान सरासरीपुढेच आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. त्याचवेळी गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वेकडील वाऱ्याच्या आंतर क्रियेच्या प्रभावाखाली, १८ ते २० मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये मेघ गरजेनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे.
तर विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या या अंदाजाने मात्र शेतकऱ्यांना मात्र गहू व हरबरा पीक या पावसाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी वेळीच काळजी घ्यावी लागणार आहे.