अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 pune News :- नागपूर कारागृहात स्थानबद्ध असलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे ची कारागृहातून सुटकाझाली आहे. गजा मारणेला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आलं होतं.
वर्षभरानंतर गजा मारणेची सुटका झाली आहे. तब्बल 8 वर्षानंतर गजानन मारणे हा तुरुंगाबाहेर असणार आहे. गजानन मारणे याच्या काढलेल्या रॅलीमधील बहुतांश गुंडावर पुणे पोलिसांनी कारवाई केलीये.
त्यामुळे आता गजा मारणेवर पुणे पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गजा उर्फ गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या असून कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे.
हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. 2014 मधील दोन हत्या प्रकरणात गजा मारणे सात वर्ष तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता.
गेल्या वर्षी या हत्येच्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. यानंतर तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी तळोजा जेल ते पुणे अशी 300 गाड्यांसह मिरवणूक काढली होती.
तसेच उर्से टोल नाक्यावर फटाके फोडत आरडाओरडा करत या सर्वाचे ड्रोन शूटही केले होते. याच मिरवणुकीमुळे गजा मारणेला पुन्हा तुरुंगवारी करावी लागली.