नगरकरांनो बेफिकिरीमुळे आकडा वाढतोय; दोघे दगावले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे मात्र अजुनही बहुतेक जण विनामास्क फिरत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर नगर शहरात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

मात्र नागरिकांचा हाच निष्काळजीपणा आता कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 337 जणांना करोना संसर्गाचे निदान झाले.

तसेच दिलासादायकबाब म्हणजे उपचारानंतर बुधवारी 271 रुग्ण कुणामुळत झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या 1 हजार 820 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बुधवारी करोना उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयानुसार 131, खाजगी प्रयोगशाळेनुसार 182, तर अँटीजेन चाचणीत 24 जणांना करोना संसर्गाचे निदान झाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24