श्रीरामपूर तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या हजार पार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यातच जिल्ह्यात दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर पडते आहे.

यातच नगर शहरामध्ये कोरोनाचे दररोज सुमारे 800 ते 900 रुग्ण सापडत आहेत. आता याच वेगाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात रविवारी दिवसभरात करोनाने कहरकेला असून काल तालुक्यात 113 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल 97 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. काल 113 रुग्ण सापडले आहे. तर 1243 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 97 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 33 खासगी रुग्णालयात 34 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 46 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 97 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुक्रात एकूण 1243 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 5695 रुग्णांना करोनाची लागण झाली होती.

तर त्यातील सुमारे 3366 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1243 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24