अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- गेल्या 24 तासात श्रीरामपूर तालुक्यात 57 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालअखेर 932 रुग्ण अॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 217 होती. जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 28 तर अॅन्टीजेन तपासणीत 26 असे रुग्ण आढळून आले आहेत.
श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 14783 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 13731 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
करोनाबाधितांची संख्या पुन्हा कमी झाल्याने दिलासा मिळाला. तर बरे होऊन घरी जाणार्यांची संख्या जास्त झाल्याने अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
त्यामुळे काल अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 932 असून हे रुग्ण श्रीरामपूर, जिल्हा तसेच जिल्हाबाहेरील रुग्णालयांत उपचार घेत आहेत.