अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने कठोर नियमांची अमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिक बेजाबदारपणे गर्दी करताच आहे.
यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये वाढ होत आहे.यातच कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा जिल्ह्यातील उत्तरेकडीन भागांमध्ये झाला आहे. गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात 86 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
बरे होऊन घरी जाणार्यांची संख्या 203 वर जाऊन पोहोचली आहे. तर 624 अॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
दरम्यान राहाता तालुक्यात आतापर्यंत 18890 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 18172 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज 624 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.
एकीकडे करोना प्रादुर्भाव वाढत असताना लसीकरण मोहीमही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. करोनापासून बचावासाठी सार्वजनिक अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा,
चेहर्यावर मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.