अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र जिल्ह्यात रुग्ण सापडत असून त्याचे नियोजन करण्यात प्रशासन व्यस्त झालेले आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागल्याने नगरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढली आहे.
नगर -शहरासह जिल्ह्यात करोनाने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवसात तब्बल 1 हजार 800 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीमध्ये समोर आले आहे.
त्यामुळे जिल्ह्यात एक प्रकारे करोनाने तांडवच घातले आहे. तर जिल्ह्यात आज 645 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या 8 हजार 335 इतकी झाली आहे.