अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे.
तसेच याचे संक्रमण पुन्हा एकदा गावपातळीवर होत असलयाचे चित्र आकडेवारीतून स्पष्ठ होते आहे. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भेटीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या २४ तासात अकोल्यात तीन जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये राजूर एकाचा तर गणोरे येथील दोघांचा समावेश आहे.
तालुक्याची एकूण करोना बाधितांची संख्या ३२०७ इतकी झाली आहे. यामध्ये राजूर येथील ५३ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर गणोरे येथील ४७ वर्षीय पुरुष तर ४४ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केले असून यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहे.
जिल्हाधीकार्यांनी जिल्ह्यात कलम १४४ १५ मार्चपर्यंत लागू केला आहे. यामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता रात्री १० ते सकाळी ५ या कालावधीत संचारबंदी राहील. विवाह कार्यक्रम यामध्ये जास्तीत जास्त ५० व्यक्तींचा समावेश असेल. प्रत्येक व्यक्तीला मास्कचा वापर व सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील.