नेवासा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच हजारांच्या पार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- बेजबादार नागरिकांमुळे जिल्ह्यासह तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

प्रशंशाकडून वारंवार सूचना करून देखील नागरिक घरात बसायला तयार नाही.अत्यावश्यकच्या नावाखाली घराबाहेर पटच आहे.

यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनत चालली आहे.यातच नेवासा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता साडेपाच हजारांच्या पार गेली आहे.

नेवासा तालुक्यातील 34 गावांतून गेल्या 24 तासात 136 करोना संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 32 संक्रमित सोनईत तर त्या खालोखाल 15 बाधित नेवासा शहरात आढळले.

मुकिंदपूर(नेवासाफाटा) येथे काल 9 तर चांदा येथे 8 करोना संक्रमित आढळले. घोडेगाव व राजेगाव येथे प्रत्येकी 6 तर माका येथे 5 संक्रमित आढळून आले.

भेंडा बुद्रुक, देवगाव, महालक्ष्मी हिवरे व वांजोळी या चार गावांतून प्रत्येकी चौघे बाधित आढळले.

दरम्यान तालुक्यातील 34 गावांतून 136 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 5 हजार 552 झाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24