विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली; प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-नगर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

नागरिकांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होताना दिसत नाहीये. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानाही नागरिक विनामास्क फिरत आहे.

तसेच दरदिवशी कोरोनाची आकडेवारी वाढत आहे तसतशी विनामास्क फिरणार्‍यांची संख्याही वाढत आहेत. यामुळे आता प्रशासन कठोर कारवाई करणार आहे.

यासाठी नगर शहरात सायंकाळनंतर चौकाचौकात कारवाईसाठी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. मास्क न वापरल्यास आता शंभर ऐवजी पाचशे रूपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

एक मार्चपासून दंडाचे दर वाढविण्यात आल्याने मास्क न वापरणार्‍यांना चांगलाच आर्थिक भूर्दंड पडणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढले आहेत.

पोलीस नाईकापासून ते अधिकार्‍यांपर्यंत सर्वांना दंड वसुलीचे व कारवाईचे अधिकार यापूर्वीच दिलेले आहेत. ते 28 फेब्रुवारीपर्यंत होते.

त्यात वाढ करण्यात आली असून, 31 मार्चपर्यंत हे अधिकार अबाधित ठेवले आहेत. यामध्ये मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धुम्रपान करणे यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24