अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीबरोबरच मृत्यूची संख्या देखील वाढू लागली आहे.
यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाचे भय पुन्हा एकदा स्पष्ठ दिसून येत आहे. जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जरा जास्तच होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
यातच श्रीरामपूर तालुक्यात काल उच्चांकी ११४ रुग्ण सापडले आहे. तर ७१४ रुग्ण अॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल १३४ रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.
जिल्हा रुग्णालयात 24 खासगी रुग्णालयात 36 तर अॅन्टीजन तपासणीत 54 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 134 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 2060 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1244 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 714 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.