अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे बाजारसमितीसह शेतकऱ्यांचे सर्व समीकरणे बिघडली होती. मात्र आता बाजरी समित्या सुरु झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना देखील आपला माल विक्रीसाठी घेऊन येताना अडचण येत नाही आहे. यातच राहाता बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक झाली आहे.
9103 गोणी कांदा आवक :- बुधवारी बाजार समितीत कांद्याच्या 9 हजार 103 गोण्या दाखल झाल्या होत्या. त्यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 1500 ते 1900 रुपये असा भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 850 ते 1450 असा भाव मिळाला.कांदा नंबर 3 ला 400 ते 800 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला. तर गोल्टी कांदा 1300 ते 1500 व जोड कांदा 100 ते 500 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
डाळींबाच्या 22800 क्रेटसची आवक :- राहाता बाजार समितीत डाळींबाच्या 22800 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला प्रतिकिलोला 96 ते 135 रुपये इतका भाव मिळाला.
डाळिंब नंबर 2 ला 71 ते 95 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.