अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- बोल्हेगाव उपनगरात साईदर्शन बिल्डिंग जवळ एका तरुणीसह चार जण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डान्स करत होते. याची माहिती संबंधित परिसरातील नागरिकांकडून पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही व्यक्तींना ताब्यात घेत थेट पोलीस ठाण्यात आणले.
त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत समज देऊन नंतर सोडून देण्यात आले. याबाबत अधिक माहिती शी कि, नगर शहरातील दोन खासगी हॉस्पिटलमधील तीन तरुण डॉक्टर व एक नर्स एका वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यांनी बोल्हेगाव उपनगरातील साईदर्शन बिल्डिंगजवळ पार्टी ठेवली.
वाढदिवसाची पार्टीत चौघांनी दारूचे सेवन केले. त्यानंतर त्यांनी परिसरात धिंगाणा घालत नाच सुरू केला. त्यांचा आरडा-ओरडा वाढल्याने स्थानिक नागरिकांनी तोफखाना पोलिसांना याची कल्पना दिली.
यानंतर सहायक निरीक्षक सुरसे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच या मंडळींची बोबडी वळली. त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
मात्र शहरातील एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शिफारस केल्याने पोलिसांनी एक तरुणी आणि तीन तरुण अशा चार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत पुन्हा असे काही करणार नाही, या लेखी जबाबावर सोडून देण्यात आले.