Breaking news. World news with map backgorund. Breaking news TV concept. Vector stock.

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- पती कार्यालयात काम करत असताना पत्नीने तेथे येऊन पतीला शिवीगाळ करत फाईली फेकून दिल्याची घटना येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात घडली.

याप्रकरणी संबंधित पतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधीत पती तारकपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातअधिकारी म्हणून काम करतात. सोमवारी ते कार्यालयात काम करत असताना त्यांची पत्नी तेथे आली.

व संबंधित अधिकाऱ्यास म्हणाली की , तु तुझ्या पगाराच्या स्लीपा मला दे, असे म्हणून आरडाओरडा करून शिवीगाळ केली. जर पगाराच्या स्लीपा दिल्या नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेल,

अशी धमकी देऊन त्यांच्याकडील फाईली हिसकावून घेत फेकून दिल्या. नंतर संबंधित अधिकारी मिटींगसाठी जात असताना त्यांना जाण्यास अटकाव करत

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.