अधिकारी दोन दिवसांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनामुळे पुन्हा एकदा राज्यातील आर्थिक परिस्थितीत ढासळू लागली आहे. मात्र राज्याच्या या परिस्थितीला यामधून बाहेर काढण्यासाठी व काहीसा हातभार मिळवा यासाठी सरकारी अधिकारी पुढे सरसावले आहे.

कोरोना काळात राज्यातील क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी आपले दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील एक-एक दिवस म्हणजे दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी दिले जाणार आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र आहे. राज्यात दीड लाख अधिकारी क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी आहेत. त्यांचं दोन दिवसांचं वेतन मिळून कमीत कमी 50 कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला मिळू शकेलं.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अर्थमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “कोरोना आपदग्रस्त स्थितीच्या या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील जनतेला धीर देत आपण अतिशय संयमाने प्रभावी उपाययोजना आखत आहात.

मा. मुख्यमंत्री यांनी 22 एप्रिल रोजी राज्यावरील संसर्गाचे हे संकट एकजुटीने घालवण्यासाठी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे देखीन आवाहन केले आहे.

त्यामध्ये राज्यातील कोरोना बाधितांवर उपचारांसाठी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी निधी कमी पडू न देण्याच्या आपल्या संकल्पास महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकाऱ्यांची देखील समर्थ साथ राहील, याची आम्ही आपणास ग्वाही देत आहोत.”

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24