अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- कोल्हार येथील बस स्थानकासमोर कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात बबन अण्णासाहेब लेंडे (वय ७४) हे जागीच ठार झाले. ही दुर्घटना सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास घडली.
घटनेनंतर चालक फरार झाला आहे. मृत लेंडे हे आपल्या वाहनाने (एमएच १७ डी ४७६५) कोल्हार बसस्थानकासमोरून जात होते.
यावेळी मालट्रक (एचआर ५५ ए एच ०१२१) चालकाने मागील बाजूने लेंडे यांना जोराची धडक दिली. यात लेंडे जागीच ठार झाले. कोल्हार पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. याबाबत कैलास बबन लेंडे यांनी फिर्याद दिली आहे.