अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात चोरी, लुटमारी आदी घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. यातच चोरटे दिवसेंदिवस अपडेटेड होत चालले आहे.
अशाच एका भामट्याने पोलीस असल्याचे बतावणी करत एका वृद्धाला लुटल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे.
श्रीगोंदा शहरातील खंडोबा मंदिर परिसरात मोटारसायकल वर अज्ञात इसमाने येऊन पोलीस असल्याची बतावणी करत
तब्बल 45 हजार रुपये किमतीच्या सोन्याचा अंगठ्या लंपास केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गोविंद शिधू भोयटे असे फसवणूक झालेल्या वृद्धांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भोईटे यांच्याजवळ दोन अज्ञात तरुण आले.
व आपण पोलीस असल्याचे सांगितले, व म्हणाले तुमच्या गावात रात्री चोरी झाली आहे तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या हातात घालू नका त्या काडून तुम्ही तुमच्या रुमालात ठेवा.
भोयटे यांनी काही वेळाने रुमाल उलगडून पाहिले असता त्यात त्यांना सोन्याच्या अंगठ्या आढळून आल्या नाहीत त्यावेळी त्याच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली.
त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत त्या अज्ञातांविरुद्धश्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.