नगर तालुक्यातील वाळकी गावात साकारतेय राज्यातील एकमेव ‘हे’ स्मारक ..?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- नगर तालुक्यातील वाळकी गावात साकार होणार ,राज्यातील पहिले सासू, सुनेचे एकत्रित स्मारक,हो हे खरे आहे. सासू, आणि सून म्हणजे विळ्या भोपळ्याचे  नाते. एकमेकांच्या पक्क्या हाडवैरी.

त्या दोघीचे सारखे तू,तू, मैं, मैं चाललेले असते. सासू कधी आई होत नाही आणि सून कधी मुलगी होत नाही. पण समाजात वावरताना असे ही काही सासू, आणि सून आपल्याला आढळतात की त्या माई लेकी प्रमाणे एकत्र नांदतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येत नाही की या सासू , सून आहेत की माई लेकी.इतके त्यांचे नाते घट्ट असते.

अशीच सासू, आणि सून यांची जोडी  वाळकी येथे होती. स्वर्गीय आसराबाई कोंडीबा लोखंडे या सासू आणि स्वर्गीय सुमनताई लोखंडे या सून होत्या. सासू कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आसराबाई लोखंडे आणि आदर्श सून कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुमन लोखंडे.

स्वर्गीय आसराबाई लोखंडे यांनी कष्ट करून आपल्या मुलाला शिकवले. मुलगा शिकून शिक्षक झाला. मुलासाठी शिकलेली बायको शोधली. तिला पुढील शिक्षणासाठी पुणे येथे  ठेवले .सून शिक्षिका झाली .हे सर्व सासू आसराबाई लोखंडे यांनी गवत विकून, मोलमजुरी करून आपल्या मुलाला आणि सुनेला स्वतःच्या पायावर उभे केले.

सून सुमन ताई लोखंडे यांच्या लहान पणी त्यांचे माता पित्याचे छत्र हरपले होते. त्यांनी आपल्या सासूला ‘आई’ मानून त्याची सेवा केली.सासूच्या आज्ञा त्यांनी पाळली.स्वतः शिक्षिका असताना  त्याचा बडेजाव न  मिरविता सदैव सासूची सेवा केली. सुमनताई लोखंडे यांचे चिरंजीव सामाजिक  कार्यकर्ते आणि प्राथमिक शिक्षक असणारे

अशोक आबा लोखंडे यांनी आपली आजी म्हणजे स्वर्गीय आसराबाई लोखंडे यांच्या स्मरणार्थ आसराबाई लोखंडे सेवा भावी संस्था स्थापन केली आहे. संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. निराधार, वंचित घटक , महिला यांना मदत केली जाते.आपल्या आजीचे स्मारक ते वाळकी गावात उभारत आहेत .

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24