अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षितेसाठी, टोळीची दहशत कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी टोळी प्रमुख मनोज डोंगरे याच्यासह चौघांना दीड वर्षांकरीता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
या सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार यामध्ये टोळीप्रमुख मनोज गोरक्षनाथ डोंगरे, स्वप्निल रमेश बोरूडे, आबासाहेब बाळासाहेब वरखेडे,
आदेश उर्फ आदिनाथ रवींद्र जाधव (सर्व रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) असे त्यांची नावे आहेत. संघटितपणे टोळी तयार करून घातकशस्त्रे,
पिस्तुल, तलवार, लाकडी दांडके अशी हत्यारे बाळगून लोकांना धमकाविणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी,
बळजबरीने चोरी आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळीविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी 27 जुलै 2020 रोजी दोन वर्षांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविला होता.
त्या प्रस्तावाला काल मंजुरी देण्यात आली. राहुरी पोलीस ठाण्याने पाठविलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निर्णय घेत ही कारवाई केली आहे. यामुळे जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.