‘स्वतःचं वजन वापरून दिल्लीतून कशी इंजेक्शन आणली हे सांगण्याचा दिखाऊपणा टाळायला हवा होता’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-तुमच्या अशिलाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. इंजेक्शन उतरवतानाचे व्हिडीओ चित्रीकरण करून नाटकीपणा करायला नको होता आणि मी स्वतःचं वजन वापरून दिल्लीतून कशी इंजेक्शन

आणली हे सांगण्याचा दिखाऊपणा ही त्यांनी टाळायला हवा होता, अशा शब्दात औरंगाबाद खंडपीठाने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर तोशेर ओढले.

काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे यांनी दिल्लीवरून खासगी विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा अहमदनगरमध्ये आणला होता. त्यानंतर त्यांनी तो साठा आणल्याचं एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केलं.

त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणात याचिका दाखल करण्यात आली. औरंगाबाद खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना सुजय विखे यांनी आणलेला इंजेक्शनचा संपूर्ण साठा प्रशासनाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

परंतु प्रशासनाने ताब्यात घेण्याआधीच संपूर्ण साठा हा सुजय विखे यांनी वाटून टाकला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रशासनाला एकही इंजेक्शन ताब्यात घेता आलं नाही. या प्रकरणात सुजय विखेंवर कारवाई होईल,

हे त्यांना माहीत असताना देखील त्यांनी धाडस करून दिल्लीवरून इंजेक्शनचा मोठा साठा अहमदनगरमध्ये आणला. होणाऱ्या कारवाईला न घाबरता लोकांचा जीव वाचवणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं असल्याने मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचं सुजय विखे यांनी बोलून दाखवलं होतं.

या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे यांच्या कृत्यावर ताशेरे ओढत ‘चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल, तर त्या कृती मागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही’. अशा शब्दात सुजय विखे यांना सुनावलं आहे.

या सर्व प्रकरणात न्यायमूर्ती घुगे यांनी सुजय विखे यांच्या वकीलाला सुनावणी दरम्यान म्हटले आहे की, तुमच्या अशिलाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. इंजेक्शन उतरवतानाचे व्हिडीओ चित्रीकरण करून नाटकीपणा करायला नको होता

आणि मी स्वतःचं वजन वापरून दिल्लीतून कशी इंजेक्शन आणली हे सांगण्याचा दिखाऊपणा ही त्यांनी टाळायला हवा होता, दरम्यान या सर्व प्रकरणात सुजय विखे यांनी 10000 इंजेक्शन आणले असा बोलबाला सुरू होता. परंतु 15 बॉक्समध्ये फक्त 1200 इंजेक्शन होती, असं स्पष्टीकरण सुनावणीदरम्यान देण्यात आलं आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24