ताज्या बातम्या

साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच याव लागत; फडणवीस यांचा पवारांना टोला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  सध्या देशात होऊ घातलेल्या ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे पक्षांनी आपली मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीसाठी पक्षाची तृणमूल काँग्रेस व काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.

यावर भाजप नेते फडणवीस यांनी निशाणा साधला असून, साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावे लागते असा खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीने देखील आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

अशातच गोव्याचे भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही,

राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच याव लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!”असे म्हणत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

Ahmednagarlive24 Office