अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- समाजवादी पार्टीच्या अहमदनगरच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी अजीम राजे यांची मुंबई येथे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असिम आजमी यांच्या हस्ते पत्र देऊन फेरनिवड करण्यात आली या वेळी फिरोज पठान, पटेल सहाब, मतीन भाई, कुद्दुस तांबटकर, अल्तमश शेख उपस्तीत होते.
पक्ष बळकटीकरणासाठी व मजबुतीकरणासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी अजीम राजे यांची निवड करण्यात आली राजे हे महासचिव जुल्फिकार आजमी यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व करत आहे गेल्या दोन वर्षापासून त्यांनी समाजवादी पार्टीची जबाबदारी संपूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पाडली आहे
राजे यांनी जिल्ह्यातील समाजवादी पार्टीचे अनेक शाखा उद्घाटन करून युवकांची फळी निर्माण करून समाजवादी पार्टी मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्न केले व पक्ष संघटना वाढवली त्यांच्या नेतृत्वात समाजवादी पार्टीचे अनेक आदोलन मोर्चे करून अनेक प्रश्न सोडविले आहे
त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यांनी यापूर्वी पक्षाच्या अनेक पदांवर काम केले असून अहमदनगर दक्षिण बरोबर उत्तर जिल्ह्यांमध्येही त्यांचा दांडगा संपर्क आहे
युवकांमध्ये ते लोकप्रिय असून पक्षाच्या कामासाठी विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो अजीम राजे यांची येणाऱ्या अहमदनगर महानगरपालिकेचे निवडणूक लक्षात घेऊन
त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना पक्षाने पुन्हा एकदा समाजवादी पार्टीच्या जिल्हा पातळीवर विराजमान केले आहे समाजवादी पक्षातील सर्व नेते पदाधिकारी व नागरिकांच्या शुभेच्छा पाठीशी घेऊन पुढील वाटचाल जोमाने करणार व युवकांच्या माध्यमातून पक्षाचे संघटन मजबूत करणार असल्याचा निर्धार
यावेळी अजीम राजे यांनी व्यक्त करून निवडीबद्दल पक्षाची व प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांचे त्यांनी आभार मानले या निवडीबद्दल अजीम राजे यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.