अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला व त्यामुळे रुग्णाच्या संतापलेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली.
दरम्यान आमच्या रुग्णाचा मृत्यू हा केवळ डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळेच झाला असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातून आलेल्या एक करोनाबाधित रुग्णावर जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डमध्ये उपचार सुरू होते.
अचानक त्या रुग्णांची प्रकृती खालावली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ही बाब रुग्णांच्या नातेवाइकांना समजल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला.
त्यातील एकाने कोविड वार्डच्या दरवाजाच्या काचा फोडल्या. दरम्यान रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना समजाविले. त्यानंतर रुग्णालयातील तणाव निवळला.