अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाने प्रत्येका जरजर करून सोडले आहे. यातच दुसर्या लाइटच्या प्रकोपामुळे राज्यासह जिल्ह्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांना ऑक्सिजन अभावी प्राण गमवावे लागले.
याच धर्तीवर शिर्डीत तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. अखेर रिलायन्स फाउंडेशन यांनी श्री साईबाबा संस्थान संचलीत श्री साईनाथ रुग्णालयासाठी हवेतून ऑक्सिजन देणारा प्लॅन्ट सुविधा देण्यास सज्ज केले आहे.
साह्य शिर्डीत रिलायन्स फाउंडेशन यांनी श्री साईबाबा संस्थान संचलीत श्री साईनाथ रुग्णालयासाठी हवेतून प्रतिमिनिटाला 1200 लिटर ऑक्सिजन निर्मिती करणारेमे. अॅटलस कॉपको इंडिया,
पुणे या कंपनीचा ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट हा देणगी स्वरुपात दिला आहे. सदर प्लॅन्टची उभारणी कंपनी इंजिनीअर्सद्वारे दिनांक 30 एप्रिल 2021 ते 30 मे 2021 या एक महिन्याच्या कालावधीत करण्यात आली.
सदर प्लॅन्टद्वारे निर्माण होणारा ऑक्सिजन वायू 93 टक्के शुध्दतेचा आहे. सदर प्लॅन्टद्वारे श्री साईनाथ रुग्णालयातील अंदाजे 250 रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल.
तसेच सदर ऑक्सिजन प्लॅन्टला कोणत्याही स्वरुपाच्या कच्च्या मालाची आवश्यकता नाही. गरजेनुसार सदर O2 Plant व्दारे रुग्णांना त्याची ऑक्सिजनची सुविधा देण्यास सज्ज आहे.