अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण (वय ५२) या व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी संशयीताचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे.
बेलापुरातील काही सीसीटीव्ही चित्रण तसेच स्थानिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली आहे. या संशयीताविषयी काही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांनी हिरण यांच्या शोधासाठी पथके तैनात केली आहेत.
बेलापूरबरोबरच श्रीरामपूर शहरातही त्यांनी तपास सुरू केला आहे. अपहरण केलेल्या हॅनचे श्रीरामपुरातून काही सीसीटीव्हीतील चित्रण मिळते का? याचीही पाहणी केली जात आहे.
पोलिसांनी काही लोकांची चौकशी केल्याची माहिती आहे. व्यापारातील काही वादातून हे अपहरण घडले का? आणखी काही करणातून त्यादृष्टीने तपास केला जात आहे.