इंडोनेशियातील समुद्रात गायब झाले विमान ; त्यानंतर झाले असे काही की

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-परवाच इंडोनेशिया मधील जकार्ता येथे इंडोनेशशियाचे एक विमान समुद्रा मध्ये कोसळले. समुद्रा मध्ये कोसळलेल्या इंडोनेशियाच्या श्री विजया एअर या विमान कंपनी च्या विमानाचा एक ब्लॅक बॉक्स हा आता सापडला आहे.

तसेच हा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर आता व्हाईस रेकॉर्डर असलेल्या दुसऱ्या ब्लॅक बॉक्स चा शोध घेण्यासाठी पाणबुडे प्रयत्नांची शर्थ करत आहे.

काल च सापडलेल्या ब्लॅक बॉक्स मध्ये विमान उड्डाणाबाबतची तांत्रिक माहिती साठवलेली आहे. व्हाईस रेकॉर्डर मिळाल्यास त्यातून विमान कोसळण्याधी नेमके काय घडले आणि कॉकपिटमध्ये झालेले संभाषण हे कळणार आहे.

दोन्ही बॉक्स मधील माहिती मिळाल्यास विमान कोसळण्याचे मुख्य कारण समजू शकणार आहे. या विमाना मध्ये तब्बल ६२ प्रवासी प्रवास करत होते.

हे विमान समुद्रा कोसळल्यानंतर समुद्र मध्ये मोठ्या लाटा आल्या आणि समुद्र मध्ये एक वस्तू बुडताना दिसत होती असे तिथे जवळ असणाऱ्या तीन मच्छिमारांनी सांगितले.

या घटनेची माहिती सुद्धा त्यांच्या मुळेच मिळाली आहे. आता सर्व जण प्रवाशांना शोधण्यासाठी तसेच विमानाचे बॉक्स शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24