‘त्यांचा रात्रीस खेळ चाले’ पोलिसांनी केले दोघेजण जेरबंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी घरासमोरील अंगणात झोलेल्या तरूणाचा मोबाईल चोरणाऱ्या दोघा भामट्यांना स्थानिक गुन्हे शखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरलेला १५ हजारांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

अविनाश बाळासाहेब घालमे (वय २०, रा.शिंदा ता.कर्जत), रोहित उर्फ सोन्या दिपक काळे (वय १९ रा.शिंदा ता.कर्जत) अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील मारूती गणपत चव्हाण (वय ३१ रा.चव्हाण मळा,जमादार वाडा)

हे त्यांच्या घरासमोर झापलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचा १४ हजार ९९९ रूपये किमतीचा रिअल मी कंपनीचा मोबाईल चोरून नेला होता. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान या घटनेचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याने माहिती दिली की, संबंधित गुन्हा हा अविनाश घालमे व त्याचा साथिदार रोहित काळे या दोघांनी केला असून

त्यांच्या वास्तव्य असलेल्या भागाची माहिती दिली. त्यानुसार पोनि.कटके यांनी स्थानिक गंन्हे शाखेच्या पथकातील पोना.संतोष लोंढे,दीपक शिंदे,शंकर चौधरी,पोकॉ.प्रकाश वाघ,रवींद्र घुंगासे,चालक पोहेकॉ.संभाजी कोतकर यांनी

कर्जत तालुक्यातील शिंदा येथून अविनाश बाळासाहेब घालमे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली देत त्याचा साथिदार रोहित काळे याच्यासोबत चोरी केल्याचे सांगितले.

त्याच्या माहितीवरून पथकाने रोहित उर्फ सोन्या दिपक काळे याला त्याच्या राहत्या घराजवळ सापळा रचून ताब्यात घेतले.त्याने चोरलेला मोबाईल पोलिसांना दिला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24