पोलिसांना तर ‘तो’सापडलाच नाही मात्र कोर्टात जात जामीन मिळवून गायब झाला!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- गँगस्टर गजा मारणे याच्या शोधार्थ पुणे, पिंपरी -चिचंवड आणि पुणे ग्रामीण या तिन्ही पोलिस दले आकाश पाताळ एक करत असतानाच हा पठ्ठा वडगाव मावळ कोर्टात हजर झाला.

तो नुसता हजर झाला नाही तर तळेगाव पोलिस ठाण्यात असलेल्या गुन्ह्यात त्याने कोर्टातून देखील जामीनही मिळवला आणि आल्या पावलाने तो गायब झाला.

एकीकडे मारणे विरुद्ध कारवाई करण्याच्या भीमगर्जना करणाऱ्या पोलिस दलांना तो सापडत नाही त्याचवेळी दुसरीकडे मात्र तो कोर्टात जामीनही मिळवत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तळोजा जेलमधून सुटल्यानंतर मारणे याने रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले होते. या शक्ती प्रदर्शाने व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर चुहूबाजुने जोरदार टीका झाली.

या मारणेमुळे पूर्ण पोलिस खात्याचीच अब्रु चव्हाट्यावर आल्यानंतर त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात अर्धा डझन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांनी तर गजा पसार झाल्याचे प्रसिद्धीस देत त्याचा शोध सुरू असल्याचे दंड थोपटून सांगितले होते.

आठ दिवसांपासून अधिक काळ तो पोलिसांना सापडला नाहीच. उलट तो कोर्टात हजर होऊन त्याने जामीनही मिळवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24