अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- आपण अनेकदा ‘पुणे तिथे काय उणे असे’ असे म्हणतो मात्र अलीकडे अनेकवेळा या म्हणीचा प्रत्यय येतो. नुकतेच एका प्रतिष्ठित कुटुंबाला सदस्यांना राजकारणात यश मिळवण्यासाठी सुनेचा छळ करत करण्यास भाग पाडून घटस्फोट घेण्याचा सल्ला देणाऱ्या बाबास पोलिसांनी अटक केली आहे.
रघुनाथ राजाराम येमूल असं अटक केलेल्या त्या अध्यात्मिक गुरूचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे कि , पुणे येथील चतुःश्रृंगी परिसरातील एका सुशिक्षित कुटुंबातील एकास तुला जर राजकीय यश मिळवायचं असेल तर तू तुझ्या बायकोला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे,’ कारण तुझी बायको तुझ्यासोबत कायम राहिली तर तू आमदार किंवा मंत्रीही होणार नाही.
असे असं सांगून एका प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करायला लावून त्या कुटुंबाला येमूल याने अघोरी कृत्य करण्यास भाग पडले. अध्यामिक गुरुच्या सांगण्यावरून त्या सुशिक्षित कुटुंबाने देखील अघोरी कृत्य करत सुनेचा छळ केला.
दरम्यान याप्रकरणी पीडित सुनेनं चतुःश्रृंगी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानंतर या बाबाविषयी माहिती समोर आली.
तो बाबा बाणेर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला असून त्याचे पुणे शहरात आणि जिल्ह्यात शेकडो भक्त आहेत. चतुःश्रृंगी पोलिसांनी या बाबाला अटक करून न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.